मुंबईः भाजपा नगरसेविकाच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. एएनआयनं या संबंधी वृत्त दिलं आहे. महिलेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.

बोरीवलीतील भाजप नगरसेविकांच्या कार्यालयात एका कार्यकर्त्यांनी महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी या प्रकार घडला आहे. महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसंच, नगरसेविका व सहकाऱ्यांनी मारहाम केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेनंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून भाजपवर जोरदार टीका केली आहे.

भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाला व महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तीचा आवाज दाबण्यासाठी तीला भाजपा नगरसेविकांनी मारहाण केली. हे भाजपचे महिला विरोधी रुप आहे, अशी टीका यांनी केली आहे. भाजपाच्या महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. आत्ता बोरीवली पोलीस ठाण्यात भाजपा नगरसेविका कार्यालयात महिलेचा भाजपा कार्यकर्त्याने विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दुर्दैव म्हणजे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार सुनील राणे यांच्याकडे तक्रार करून न्याय मिळाला नाही, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

नगरसेविकेचे स्पष्टीकरण

काही महिन्यांपूर्वी सदर महिला पक्षाचे काम करण्यासाठी आणि पद मिळवण्याच्या हेतून आमच्या संपर्कात आली होती. त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यासोबत तिचे वाद झाले होते. त्यावेळी या प्रकरणाची तक्रार खासदारांकडे केली होती. मात्र, पुन्हा त्या महिलेला माझ्या कार्यालयात बोलावले असता तिने कार्यकर्त्याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ती त्यास मारण्यास उठली असता आमच्या नगरसेविका व अन्य महिला सहकाऱ्यांनी तिला कार्यालयाबाहेर काढले. त्या दिवसापासून ती महिला पोलिसांच्या नावाने आणि वकिलांच्या नावाने आम्हाला अडकवण्याच्या धमक्या देत आहे, असं पत्रक भाजपच्या नगरसेविकांनी जाहीर केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here