मुंबई: साकीनाका येथे महिलेवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर विरोधी पक्ष प्रचंड आक्रमक झाला आहे. राज्य सरकारनं आतातरी अशा घटनांकडं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे,’ असं विरोधी पक्ष नेते यांनी म्हटलं आहे. (Devendra Fadnavis on )

डोंबिवलीतील घटनेबद्दल समजताच फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे. अतिशय भयंकर आणि संतापजनक घटना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही घटना ऐकून मन सुन्न झालं. महिला अत्याचाराची सातत्यानं वाढणारी ही प्रकरणं चीड आणणारी आहेत. ही घटना उघडकीस आल्यामुळं राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘डोंबिवली हे शांत शहर समजलं जातं. अशा ठिकाणी ही घटना घडणं अतिशय गंभीर व धक्कादायक आहे. यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपींना जरब बसेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी राज्य सरकारनं आतातरी तातडीनं आणि गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे.

काय घडलं होतं?

डोंबिवली नजीक असलेल्या परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीची एका तरुणाशी ओळख होती या ओळखीतून त्यांच्यात जानेवारी २०२१मध्ये शारिरीक संबध निर्माण झाले. या तरुणानं अश्लील व्हिडिओ बनवून मुलीला ब्लॅकमेल करत आपल्या इतर मित्रांना घेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. तब्बल ९ महिने हा प्रकार सुरू होता. पीडित मुलीला डोंबिवली, रबाळे, वडवली, बदलापूर अशा विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत २ अल्पवयीन आरोपीसह २३ जणांना अटक केली आहे. उर्वरित ६ आरोपींचा शोध सुरू आहे. कल्याण ग्रामीण भागातील शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी या राजकीय पक्षातील पुढाऱ्यांची मुलांचा यात सहभाग असल्याची चर्चा आहे. मात्र, आरोपींची नावं अद्याप उघड करण्यात आलेली नाहीत. या प्रकरणाचा तपास ठाण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले करत आहेत.

हेही वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here