: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कक्ष अधिकाऱ्यांनी दिले होते. १४ सप्टेंबरला काढलेला आदेश ९ दिवसात स्थगित करण्यात आला आहे. कक्ष अधिकारी सरोज पावसकर यांनी गुरुवारी स्थगिती आदेश काढला.

दोषींवर कारवाई होण्याच्या भीतीने आर्थिक तडजोड करून चौकशीला स्थगिती मिळवल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. दरम्यान, जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचा आदेश अवघ्या नऊ दिवसात स्थगित केल्याने याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनावश्यकपणे ३० ते ४० कोटी रुपये खर्च केल्याची तक्रार फत्तेसिंह नाईक आणि सुनील फराटे यांनी सहकार विभागाकडे केली होती. बँकेचे इमारत बांधकाम, मुख्य कार्यालय आणि शाखांमधील फर्निचर खरेदी, एटीएम मशीन, पैसे मोजण्याचे मशीन, इत्यादी बाबींवर, आवश्यकता नसताना सुमारे ३० ते ४० कोटींचा खर्च केल्याचा तक्रारदार यांचा आरोप होता. यानुसार कक्ष अधिकारी सरोज पावसकर यांनी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून अहवाल देण्याचे आदेश सहकार विभागाला दिले होते.

चौकशीला सुरुवात होण्यापूर्वीच कक्ष अधिकाऱ्यांनी नवीन आदेश काढून चौकशीला स्थगिती दिली आहे. शिवाय तक्रारीबाबत त्यांनी बँकेचा खुलासाही मागवला आहे. १४ सप्टेंबरला काढलेला आदेश पुढील आदेश येईपर्यंत स्थगित केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक तडजोड करून चौकशीला स्थगिती आणल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here