म.टा.वृत्तसेवा,

डोंबिवलीत अल्पवयीन तरुणीवर सामुहिक बलात्काराच्या घटनेने शहर हादरलेले असतानाच कल्याणात खाजगी शिकविणी घेणाऱ्या शिक्षकाने एका ८ वर्षीय बालिकेवर लैगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपी मूदर फक्रुद्दीन तालवाला ४२ या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. (A minor girl has been raped in Kalyan and police have arrested the accused)

कल्याण पश्चिमेकडे राहणारी ८ वर्षीय चिमुरडी एका खाजगी शिकवणी घेणाऱ्या पती पत्नीकडे शिकवणीसाठी जात होती. दीड महिन्यापूर्वी मुदर तालवाला याची पत्नी बाहेरगावी गेली असून तेव्हापासून मुदर एकटाच विद्यार्थ्याची शिकवणी घेत होता. मात्र यातील एका ८ वर्षीय चिमुरडीशी शिकवणीदरम्यान गैरवर्तन करत मुदर याने तिच्याशी लैगिक अत्याचार केला.

क्लिक करा आणि वाचा-
दीड महिन्यापासून हा प्रकार सुरु असल्याने घाबरलेल्या चिमुरडीने शिकवणीला जाण्यास नकार देत घडलेली घटना आपल्या आईला सांगताच आईने विकृत मुदर तालवाला विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तालवाला याला अटक केल्याचे बाजारपेठ पोलिसांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर गेल्या ९ महिन्यांपासून अनेक ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणात एकूण २९ जण या मुलीवर अत्याचार करत होते. या मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवून या व्हिडीओ च्या आधारे या मुलीला ब्लॅकमेल केले जात होते. तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २ अल्पवयीन आरोपीसह २३ जणांना अटक केली आहे. तर, उर्वरित ६ आरोपीचा शोध सुरू आहे. ही माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here