जळगाव: जिल्ह्यात टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे. बदला घेण्याच्या भावनेतून नशिराबाद जवळ जामिनावर सुटून आलेल्या तरुणाच्या खूनाच्या घटनेपाठोपाठ गुरुवारी जळगाव शहरात सुपारी देवून भरदिवसा झालेल्या गोळीबाराने जिल्हा हादरला आहे. माजी महापौर यांच्या मुलाची नोव्हेंबरमध्ये हत्या झाली होती. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अशोक सपकाळे यांच्या दोघा मुलांनी साथीदारांना जामिनावर असलेल्या संशयित आरोपीच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार चार जणांनी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता भरदिवसा त्याच्या घरात घुसून त्याच्यावर गोळीबार केला. मात्र, या घटनेत तो संशयित बचावला तर गोळीबार करणाऱ्यांपैकी एक जण मारहाणीत गंभीर जखमी झाला. आकाश मुरलीधर सपकाळे (वय २४, रा. कांचननगर, जळगाव) असे गोळीबारात बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर मारेकऱ्यांपैकी विक्की अलोने हा मारहाणीत जखमी झाला आहे. ( )

वाचा:

जळगाव शहरातील कांचननगर परिसरात राहणारे मुरलीधर गयभू सपकाळे यांचा मुलगा हा माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा (वय २८) याच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आहे. आता तो जामिनावर बाहेर आहे. आकाशला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अशोक सपकाळे यांचे पुत्र बाबू व सोनू सपकाळे यांनी त्यांचे साथीदार विक्की अलोने, मिलिंद सकट, बंटी उर्फ प्रद्युम्न नंदू महाले व राहुल भालेराव यांना सुपारी दिली होती. त्यानुसार चौघे गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता रिक्षाने कांचननगरात आकाशच्या घरी आले. तेव्हा मुरलीधर सपकाळे व त्यांची दोन्ही मुले आकाश व नितीन सपकाळे हे घरात झोपलेले होते. विक्की व मिलिंद यांनी आकाशवर गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. यावेळी हल्लेखोरांसोबत झटापट झाली. यात दोघे भाऊ थोडक्यात बचावले. मारेकऱ्यांनी पिस्तूलातून केलेल्या ४ राऊंड फायरपैकी एक गोळी आकाशच्या हाताच्या करंगळीला लागल्याने तो जखमी झाला.

वाचा:

पळून जाताना पडलेल्या विक्कीला मारहाण

गोळीबारानंतर झटापट झाल्याने मारेकरी पळून जात असताना विक्की अलोने याचा पाय घराबाहेर असलेल्या गटारीत गेल्याने तो खाली पडला. याचवेळी त्याचे साथीदार मिलिंद, बंटी व राहुल हे पळून गेले. त्यानंतर मुरलीधर सपकाळे यांच्यासह आकाश, नितीन व रुपेश सपकाळे यांनी विक्की अलोने याला पकडून लाकडी दांडक्याने, दगडाने जबर मारहाण केली तर आकाशने चाकूने वार करीत विक्कीला गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, फायर झालेले ४ राऊंड तसेच संशयित आरोपीचा मोबाइल, रुमाल असे साहित्य जप्त केले. जखमी विक्की व आकाशला पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी पोलिसांनी विक्कीचा जबाब नोंदवला. दरम्यान, या घटनेप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात आकाश सपकाळे व विक्की अलोने या दोघांनी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी दोन्ही गटातील १० जणांना अटक केली आहे.

वाचा:

भावाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी दिली सुपारी

जळगाव शहरातील शिवाजीनगरातील स्मशानभूमीजवळ ४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे (वय २८) याचा एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात खून झाला होता. या खून प्रकरणी आकाश मुरलीधर सपकाळे (रा. कांचन नगर), गणेश दंगल सोनवणे (रा. वाल्मिक नगर), विशाल संजय सपकाळे (रा. राजाराम नगर), रुपेश संजय सपकाळे (रा. कांचन नगर) आणि महेश राजू निंबाळकर यांना अटक करण्यात आली होती. यातील संशयितांना नंतर जामीन मिळाला होता. यातीलच एक संशयित आकाश सपकाळे याच्यावर हल्लेखोरांनी घरात घुसून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. दरम्यान, भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठीच माजी महापौर पुत्रांनी साथीदारांना सुपारी देऊन गोळीबार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट होत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टोळी युद्धाचा प्रकार

माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राजू उर्फ बाबू सपकाळे याने शिवाजीनगर परिसरातील तरुणांना हाताशी घेऊन नावाची टोळी तयार केली आहे. तसेच शहरातील कांचननगर-जैनाबाद परिसरात आकाश सपकाळे हा लाडू गॅंगचा लीडर आहे. या दोन्ही टोळ्यांमधील संघर्षातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here