वॉशिंग्टनः पंतप्रधान मोदींनी गुरुवारी अमेरिकेच्या बड्या कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. त्यांनी क्वालकॉम, अॅडॉब, फर्स्ट सोलर, जनरल अॅटॉमिक्स, ब्लॅकस्टोनच्या सीईओंची भेट घेतली. क्वालकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टियानो आमोन यांनी भारतासह 5 जी, पीएम वाणी आणि महत्त्वाकांक्षी डिजिटल परिवर्तन कार्यक्रमांवर काम करण्याचा उत्साह व्यक्त केला.

भारतातील अविश्वसनीय संधींबद्दल ते बोलले. भारत एक मोठी बाजारपेठ आहे. पण एक मोठी निर्यात बाजारपेठ म्हणूनही भारताकडे आम्ही बघतो. फक्त भारतीय बाजारच नव्हे तर इतर देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योजना तयार करण्याची भारतासाठी ही योग्य वेळ आहे, असं ते म्हणाले.

पीएम मोदींनी क्वालकॉमच्या सीईओंची भेट घेतली

क्वालकॉमद्वारे देण्यात आलेल्या प्रस्तावांवर भारत सक्रियपणे काम करेल, असं आश्वासन पीए मोदींनी दिलं. तसंच भारताने 5G मानके तयार केली आहेत आणि क्वालकॉमने ज्या प्रमाणे NAVIK साठी काम केलं तशाच प्रकारे यातही सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन केलं.

सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आमच्या PLI योजनांचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी भारताच्या ग्रीन हायड्रोजन मिशनबद्दल सांगितलं. सीईओ आणि पीएम दोघांनीही भारतात सौर उत्पादनं वाढवण्यास सहमती दर्शविली, ज्यामुळे या क्षेत्रातील इतर देशांनाही फायदा होईल.

PM मोदींची अॅडॉबच्या सीईओंसोबत बैठक

पंतप्रधान मोदींची CEO शांतनु नारायण यांच्याशी एक बैठक घेतली. करोनाविरोधी लढाई आणि विशेषत: जलद लसीकरणाच्या भारताच्या प्रयत्नांचं नारायण यांनी कौतुक केलं. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त योगदान देण्यासाठी त्यांनी रूची दाखवली. त्यांनी भारतातील प्रत्येक मुलासाठी व्हिडिओ, अॅनिमेशन आणण्याची इच्छा व्यक्त केली. तर प्रत्येक मुलाला स्मार्ट शिक्षण देणं महत्वाचे आहे आणि यामुळे तंत्रज्ञान खूप महत्त्वाचं आहे. कोविड युगात डिजिटल शिक्षणाचा पाया रचला गेला आहे आणि आपण आता पुढे जायला हवं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. Adobe चे सीईओ आणि पंतप्रधान मोदी दोघांनीही भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात (artificial intelligence) उत्कृष्टतेची काही केंद्रे निर्माण करण्यावर भर दिला.

फर्स्ट सोलरच्या सीईओना भेटले

वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदी आणि फर्स्ट सोलरचे सीईओ मार्क विडमार यांच्यात चर्चा झाली. मार्क विडमार यांनी हवामान बदल आणि संबंधित उद्योगांसाठी भारतीय धोरणांवर आनंद व्यक्त केला. एक जग, एक सूर्य आणि एक ग्रिड उपक्रम आणि त्याच्या क्षमतेबद्दल पंतप्रधान मोदी बोलले. भारताच्या 450 गीगावॅट अक्षय ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाचा उल्लेख केला. सौर ऊर्जेच्या निर्मितीवर भारताने लक्ष केंद्रीत केल्याच्या मुद्द्यावरही भर दिला.फर्स्ट सोलरचे सीईओ आणि पीएम मोदी दोघांनीही भारतात सौर उत्पादन वाढवण्यास सहमती दर्शविली.

PM मोदी ब्लॅकस्टोनच्या सीईओना भेटले

पंतप्रधान मोदी आणि ब्लॅकस्टोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन श्वार्जमन यांच्यात चांगली बैठक झाली. ब्लॅकस्टोनची भारतातील गुंतवणूक आणि ती आणखी विस्तारित करण्याच्या त्यांच्या योजनांबद्दल श्वार्जमन बोलले. भारतात ब्लॅकस्टोनच्या भागीदारीच्या आणखी विस्तारासाठी भरपूर वाव आहे आणि भारतात केलेल्या सुधारणांची तपशीलवार माहिती पीए मोदींनी दिली. भारताच्या क्षमतेबद्दल खूप आशावादी आहेत आणि भारत हा जगातील सर्वात वेगाने पुढे जाणाऱ्या देशांपैकी एक आहे, असं श्वार्जमन म्हणाले. भारताने केलेल्या सुधारणांचंही त्यांनी कौतुक केलं. जगातील गुंतवणुकीसाठी भारत ही आमची सर्वोत्तम बाजारपेठ आहे, असं ते म्हणाले.

जनरल अॅटॉमिक्सच्या सीईओंसोबत चर्चा

पंतप्रधान मोदींची जनरल अॅटॉमिक्सचे सीईओ विवेक लाल यांच्यासोबतही बैठक झाली. भारताचे उदार ड्रोन धोरण आणि पीएलआय योजनेमुळे उत्पादन क्षेत्रातील संधीबद्दल पंतप्रधान मोदींनी सांगितलं. तर ड्रोनच्या निर्मितीसाठी भारत एक आकर्षक ठिकाण आहे. ड्रोनच्या संपूर्ण इकोसिस्टमला समर्थन देण्यासाठी भारतात एक समर्पित ड्रोन हब तयार केले जाऊ शकते, विवेक लाल म्हणाले. भारताच्या अंतराळ सुधारणांचीही त्यांनी प्रशंसा केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here