रात्री १०.०० वाजता सुरू झालेली ही बैठक उशिरा २.०० पर्यंत सुरू होती. या बैठकीत राहुल गांधी यांच्याशिवाय , पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत, के सी वेणुगोपाळ आणि मुख्यमंत्री उपस्थित होते.
पंजाबच्या नव्या मुख्यमंत्री चन्नी यांनी नुकताच आपला पदभार ग्रहण केलाय. त्यांच्या मदतीला दोन उपमुख्यमंत्रीही देण्यात आले आहेत. परंतु, चन्नी यांचं मंत्रिमंडळ कसं असेल? याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे, केवळ मुख्यमंत्री निवडीनंतर दिल्ली नेतृत्वाचं काम संपलेलं नसल्याचंच चित्र काँग्रेसमध्ये दिसून येतंय.
दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री खुलेपणाने काँग्रेस नेतृत्वाविषयी आणि पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्याविषयी आपली नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र, अमरिंदर यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यापासून काँग्रेसकडून टाळण्यात येतंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times