जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथिल खून तसेच त्यापाठोपाठ जळगावात झालेल्या गोळीबाराच्या घटना या पार्श्वभुमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी.जी. शेखर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यांवर आले आहेत. दोन्ही घटनास्थळांवर भेट देवून आढावा घेतल्यानतंर अधिक्षक कार्यालयात आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून डॉ. पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अवैध गावठी पिस्तुलांसारखी शस्त्रे, अवैध सावकारी व महिला अत्याचार यातील गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचा मानस व्यक्त केला.
वाचाः
यावेळी बोलतांना डॉ. शेखर यांनी सांगीतले की, जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या गोळीबारांच्या घटनांची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे यापुढे जास्तीत जास्त अग्नि शस्त्रे अर्थात गावठी पिस्तुल जप्त करण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबविली जाणार आहे. अवैध शस्त्रां विरोधातील कारवाईचे परिणाम लवकरच दृश्य स्वरुपात दिसतील असे देखील त्यांनी सांगीतले.
पाच वर्षातील शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांचे रेकॉर्ड
गेल्या पाच वर्षातील अवैध शस्त्र बालगणाऱ्या संशयितांचा डाटा संकलीत करण्याचे काम सुरु आहे. हे गुन्हेगार आता कुठे आहेत? याची माहीती घेवून त्यांच्यावर एमपीडीए व मोका तसेच प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. गुन्हेगारांच्या मनात दहशत निर्माण होण्याच्या दृष्टीने कामकाज केले जाणार असून याप्रकरणी संपुर्ण परिणाम मिळेपर्यंत कारवाई सुरुच राहणार आहेत.
तस्करी रोखण्यासाठी मास्टर प्लॅन ; मध्यप्रदेशातील अधिकाऱ्यांशी चर्चा
जळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या उमर्टी या गावातून होणारी अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. तसेच यासाठी बॉर्डर कॉन्फरन्ससह मध्यप्रदेशातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलून मदत घेण्यात येणार असल्याची माहीती देखील डॉ. शेखर यांनी दिली.
वाचाः
अवैध सावकारी रोखणार
अवैध खासगी सावकारीत सर्वसामान्य लोकांसह शेतकरी अडकतो. खासगी सावकार व्याजाच्या रकमेत मालमत्ता हडप करतात. कुणाला काही माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
गुन्हेगारांकडे एक तर पोलिसांकडे अनेक हत्यार
महिला अत्याचार, छेडछाड प्रकरणी गुन्हेगारांचा डाटा संकलीत करण्याचे काम सुरु आहे. गुन्हेगारांकडे एक हत्यार असते मात्र आमच्याकडे अनेक हत्यार असतात. त्यामुळे निर्धास्तपणे गुन्हेगारीची कुणाला माहिती असल्यास ती देण्याचे आवाहन यावेळी डॉ. शेखर यांनी केले.
वाचाः
जिल्ह्यात ५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावणार
जिल्ह्यात होणाऱ्या अनुचित घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ५०० सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरु असून त्यानतंर हा ७ ते ८ कोटींचा प्रस्ताव डीपीडीसीला सादर करण्यात येणार असल्याची माहीती पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी दिली. पत्रकार परिषदेत अप्पर पोलिस अधिक्षक गवळी, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता आदी उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times