जळगाव: ‘मागील पाच वर्षे पारदर्शक काम केल्याचा दावा करणाऱ्या केंद्र सरकारने दिल्लीतील हिंसाचारावरून त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर द्यायला हवं. दिल्ली हिंसाचाराच्या काळात गृहमंत्रालय नेमकं काय करत होतं?, याची चौकशी पंतप्रधान कार्यालयातून झालीच पाहिजे व त्याची जाहीर माहिती दिली पाहिजे,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार यांनी आज केली. ‘अमित शाहांच्या जागी मी असते तर निश्चितच आत्मचिंतन केले असते,’ असंही त्या म्हणाल्या.

वाचा:

सुप्रिया सुळे आज जळगावच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी दिल्ली हिंसाचारावर भाष्य केलं. ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशात आलेले असताना दिल्लीत अशा पद्धतीने दंगल होणे, ही दुर्दैवी बाब आहे. हे खरं तर गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी केली.

वाचा:

राज्यात सत्तारूढ झालेलं महाविकास आघाडी सरकार महिला सुरक्षेच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. इतर बाबतीतही सरकार चांगले काम करत आहे. महिला सुरक्षेसाठी आणखी चांगले आणि कठोर कायदे सरकार करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here