डोंबिवली : अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवून व्हिडिओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर ३३ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली. या प्रकरणाचे पडसाद आता आणखी तीव्र झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी २३ जणांना बेड्या ठोकल्या असून इतर जणांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरणही तापलेले पाहायला मिळतं. सोशल मीडियावरही तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

या सगळ्यात मनसेकडून डोंबिवलीत लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे राजकीय वातावरण आणखी चिघळलं आहे. मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी चंदनवाडी याठिकाणी बॅनर लावून ३३ राक्षसांना फाशी देण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर फाशी द्या किंवा त्यांचं गुप्तांग कापा असं त्यांनी थेट बॅनरमध्ये लिहलं आहे. त्यांच्या या बॅनरची देखील सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

यामुळे मनसे या घटनेवरून तीव्र भूमिका घेत असल्याचं समोर येत आहे. संबंधित बॅनरमध्ये ३३ नराधमांचा प्रतीकात्मक फोटो म्हणून ३३ तोंडी राक्षसाचा फोटो लावण्यात आला आहे. तर ‘डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या ३३ तोंडी बलात्कारी राक्षस आज फाशी तरी द्या नाहीतर त्यांचे गुप्तांग कापा’ असं या बॅनरवर लिहिण्यात आले. त्यामुळे यावर पुढे काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Dombivli Gangrape) प्रकरणातील चौकशीत आणखी काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत. मुलीसोबतच्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपी विजय फुके याने २९ जनेवारी रोजी तिच्या नकळत अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रांच्या साथीने तिला थंडपेयातून नशेची पावडर तर कधी जबरदस्तीने दारू पाजत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. आपल्यावर अन्याय करणाऱ्या सर्व नराधमांची नावे या मुलीने पोलिसांना सांगितली असून, त्याआधारे पोलिसांनी ३३ पैकी २९ जणांना अटक केली आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

शुक्रवारी अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर, उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध भागांत तीन पथके धाडली आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सोनाली ढगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष महिला पथक करत आहे. दरम्यान, हे सर्व आरोपी नशेबाज असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. विविध राजकीय पक्षांचे आणि संघटनांचे पदाधिकारी मानपाडा पोलिस ठाण्याबाहेर आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी निदर्शने करत असल्याने तणाव निर्माण झाला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here