संसदेच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे. २०२२ मध्ये संसदेच्या नव्या इमारतीचं बांधकाम पूर्ण होईल. नवी संसद त्रिकोणी आकाराची असेल. २०२२ मध्ये स्वातंत्र्य दिनाला इमारत बांधून पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. २०२२ मधील संसदेचं पावसाळी अधिवेशन हे नव्या इमारतीत घेण्याचा सरकारचा विचार आहे.
पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षा १० डिसेंबरला सेंट्र विस्टा प्रोजेक्टची पायाभरणी केली होती. इमारतीचे बांधकामहे टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी करत आहे. या योजनेवर ९७१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
नव्या संसद भवनात लोकसभेच्या ८८८ सदस्यांसाठी आसन व्यवस्था असेल. याशिवाय राज्यसभेत ३२६ हून अधिक सदस्यांची आसन व्यवस्था असेल. तसंच १२२४ सदस्यांची एकाच वेळी बसण्याची व्यवस्थाही असले. प्रत्येक सदस्यासाठी ४०० चौरस फूटांचे ऑफीस असेल. नवी संसद जुन्या इमारतीच्या १७ हजार चौरस मीटर मोठी आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times