स्वरा भास्कर हिनं ट्विटरवर म्हटलं होतं की, पुढं व्हा आणि दगडफेक करा.. दिल्ली पोलिसांसाठी टाळ्या. कर्तव्यांच्या उपेक्षांसाठी तुम्ही तुमच्यातला एक माणूस गमावला. यावेळी स्वरानं शहीद दिल्ली पोलीस हवालदार रतनलाल यांच्याबद्दल बोलत होती. स्वरानं ट्विट केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. एका ट्विटर युजरनं स्वराला ‘नागिन’ असं संबोधलं आहे. तिच्यावर टीका करताना त्या युजरनं लिहिलं आहे की, तू नागिन आहेस…दोन महिन्यांपासून तू विष पसरवत आहे आणि आता तू दु:ख व्यक्त करत आहे. यासर्वाची तुला देखील किंमत मोजावी लागणार आहे. देव हे पाहत आहे’.
स्वराला ‘नागिन’ असं बोलणाऱ्या युजरला सडेतोड उत्तर दिलं आहे. तिनं म्हटलं आहे की, काका तुम्ही माझी काळजी करू नका. हे सगळं मृत्यू तुमच्या विचारसरणीचं फळ आहे. एक दिवस ही आग सर्वांच्याच घरापर्यंत येणार आणि हे सगळं तुमच्यामुळंच होणार आहे.
वाचा:
दरम्यान, जावेद अख्तर यांनी देखील ट्विरवर पोस्ट शेअर करताना लिहिलं की, दिल्लीत हिंसेची पातळी वाढतच चालली आहे. सर्वच कपिल मिश्रा हळूहळू समोर येत आहेत. एक वातावरण निर्मिती केली जात आहे. यात दिल्लीकरांना हे समजावलं जात आहे की हे सगळं सीएएच्या विरोधात होत आहे. काही दिवसांनंतर दिल्ली पोलीस त्यांच्या अखेरच्या समाधानापर्यंत पोहोचतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times