मुंबईः काँग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनानं रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी मतदान होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीनं प्रयत्न केले होते. अखेर आघाडीच्या प्रयत्नांना यश आलं आहे. राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध ( Rajya Sabha by poll) होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसनं (Congress) केलेली विनंती मान्य करत भाजपनं माघार घेतली आहे.

राज्यसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पाटील यांनी बिनविरोध निवडून आणण्यासाठी थोरात व पटोले यांनी थेट फडणवीस यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. एखाद्याच्या निधनानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी ही राज्याची परंपरा आहे, अशी काँग्रेसची भावना होती. तसंत, काँग्रेसच्या या विनंतीवर देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत, असंही नाना पटोले यांनी म्हटलं होतं.

वाचाः
भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय हे आपला अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळं आता राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपनं काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

वाचाः
दरम्यान, हसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यामुळं आघाडीतील इतर दोन घटक पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने घेतलेल्या पवित्र्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून नाराजीचा सूर आळवला जात असल्याचे समजते. बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेसनेत्यांनी भाजपसमोर लोटांगण घातल्याची भावना या घटक पक्षांकडून व्यक्त होत आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here