म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्यातील रंगकर्मीनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाट्यगृह आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी दिली, मात्र २२ ऑक्टोबरपासून परवानगी दिल्याने नवरात्रोत्सवात कार्यक्रम करणे अशक्य आहे. याचा फटका रंगकर्मींना बसणार असल्याने सरकारच्या या धोरणाविरोधात कोल्हापुरात प्रतिकात्मक करण्यात आले. (actors in staged a pitru smriti agitation against the police of government)

तत्पूर्वी राज्यामध्ये नवरात्र उत्सव साजरा होत असल्यामुळे लोक कलावंत आणि सांगीतिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे कार्यक्रम या नवरात्र उत्सवामध्ये व्हावेत तसेच खुल्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे २२ ऑक्टोबर २०२१ पासून नाट्यग्रहे आणि चित्रपटगृहे सुरू करण्यासंदर्भात सरकारी अध्यादेश (जी.आर )काढावा म्हणून हे प्रतीकात्मक पितृस्मृती आंदोलन करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा-
प्रतिकात्मक पितर म्हणून नृत्य, नाट्य ,संगीत ,चित्रपट ,साहित्यिक या क्षेत्रातील दिवंगत रंगकर्मींचे पूजन सुनील मुसळे यांनी केले. यावेळी मंत्रोपचार मकरंद लिंगनूर कर यांनी केले. यावेळी सुनील घोरपडे ,प्रसाद जमदग्नी, धनंजय पाटील, रोहन घोरपडे ,मुकुंद सुतार ,समीर भोरे, सुरेश शुक्ल,महेश सोनुले ,अंगराज सुतार ,मंजिरी देवन्नावर ,दिनेश माळी ,श्रीधर जाधव ,मनोज जोशी रमेश सुतार इ.उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here