‘आज या प्रवेशामुळे संघटनेला आणि आम्हाला बळ मिळणार आहे. सर्वांचे स्वागत,’ अशी प्रतिक्रिया या प्रवेश सोहळ्यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
धनंजय मुंडे यावेळी म्हणाले की, “२०१२ झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माझा दारुण पराभव झाला. आज परळी पंचायत समिती, परळी मार्केट कमिटी आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. मातीतल्या माणसांनी मला पाठिंबा दिल्यामुळेच हे यश मिळवता आले.”
जयंत पाटलांची भाजपवर टीका
या कार्यक्रमात भाजपवर टीका करताना जयंत पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांना थोडा फायदा मिळू लागला तर भाजपच्या पोटात दुखतं. महागाई वाढवून सामान्य लोकांना वेठीस धरले जात आहे. दिल्लीत सेंट्रल विस्टा प्रोजेक्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आलिशान घर बांधले जात आहे, याची देशाला खरंच गरज आहे का?” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
दरम्यान, मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडत असून शेतीमालाचे मोठे नुकसान झालं आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासन नुकसान भरपाई देण्याची सगळी व्यवस्था करेल, अशा शब्दात जयंत पाटील यांनी परळी येथे बोलताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times