याबाबत अधिक माहिती अशी की, या घटनेतील संशयित आरोपी नितीन सुभाष पवार (वय ३२) याने २०१३ मध्ये सिडकोतील शिवाजी चौक येथे त्याच्या नातलगातील दोन महीलेवर धारदार शस्त्राने वार करीत खून केला होता. याप्रकरणी पवार याला जन्मठेपेची शिक्षा लागल्याने तो कारागृहात होता. यातून करोना काळात काही दिवसांपूर्वीच पॅरोलवर बाहेर आला असताना आरोपी नितीन पवार याने सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका महिलेच्या ब्युटी पार्लरमध्ये घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवत बळजबरीने बलात्कार केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. याप्रकरणात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी अंबड पोलीस ठाणे येथे भेट दिली व गुन्हेगाराला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.
वाचाः
नागरीकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी, घरफोडी, मर्डर खून, दरोडा यासारखे प्रकार वारंवार घडत असल्याने पोलिस गुन्हेगारीच्या तसेच चोरीच्या घटनांची उकल करण्यास असमर्थ दिसून येत आहे. यास घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. पुन्हा एकदा पॅरोलवर बाहेर येणार्या गुन्हेगारांकडून बलात्काराची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारी बाबत पोलीस आयुक्त काय दखल घेणार अशी चर्चा नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times