आज राज्यात झालेल्या ६० रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ६५ हजार २७७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येचा ग्राफ येतोय खाली
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३६ हजार ७९४ इतकी आहे. काल ही संख्या ३७ हजार ०३६ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार २६३ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ६ हजार ००१ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार ५३१ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार ०७७ वर आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार २७२ आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ५७६ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत उपचार घेत आहेत ५,०६३ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार ०६३ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६९८ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ६६२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८१७ इतकी खाली आली आहे.
धुळे, भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी २ सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ३३०, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ११५ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या १०८ वर आली आहे. तर धुळे आणि भंडाऱ्यात सर्वात कमी, प्रत्येकी २ सक्रिय रुग्ण आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
२,५४,९८५ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ८४ लाख २९ हजार ८०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ४४ हजार ६०६ (११.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ५४ हजार ९८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ५१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times