जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव मतदारसंघाच्या विकासकामांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत केला होता. पालकमंत्री भुजबळ यांनी निधीचा विनियोग नीट केलेला नाही, असे कांदे यांचे म्हणणे होते. तसेच दहा कोटींच्या कामांचा निधी परस्पर कंत्राटदारांना दिल्याचा आरोप त्यांनी केला होता.
क्लिक करा आणि वाचा-
यासंदर्भात आमदार कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या प्रकरणी सुनावणी होण्यापूर्वीच या वादाला कांदे यांच्या दाव्यामुळे वेगळे वळण लागले आहे. छोटा राजन टोळीकडून धमकी आल्याचा दावा केल्यानंतर आमदार कांदे यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
हा खटला मागे घेण्यात यावा यासाठी छोटा राजनच्या पुतण्या आपल्याला धमकावले असल्याचे कांदे यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times