सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर कॅबिनेट मंत्री परगट सिंग आणि अमरिंदर सिंग राजा यांनी सिद्धू यांची पतियाळामध्ये भेट घेतली. दोन मुद्दे आहेत, त्यावर बोलणं झालं आहे. कधीकधी गैरसमज होतात. आम्ही ते दूर करू, असं परगट सिंग यांनीही माध्यमांना सांगितलं. ‘एक, दोन छोटे मुद्दे आहेत. यामुळे आपसातील गैरसमज निर्माण झाल्याने विश्वासाला तडा गेला आहे. ही फार मोठी गोष्ट नाही, उद्या संपूर्ण प्रकरण मिटेल, असा दावा काँग्रेस नेते अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी केला आहे.
मुख्यमंत्री चन्नी यांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी बुधवारी सकाळी १०.३० वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. चन्नी मंत्रिमंडळाची बैठक आधी १ ऑक्टोबरला होणार होती. पण पंजाबमध्ये सुरू असलेला राजीनामा आणि राजकीय हालचाली पाहता चन्नी यांनी ही बैठक आज बोलावली आहे.
दुसरीकडे, सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या गटातील आमदार आणि मंत्रीही आपल्या पदाचे राजीनामे देत आहेत. कॅबिनेट मंत्री रझिया सुलताना यांनी राजीनामा दिला आहे. रजिया सुलताना यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता आणि महिला आणि बालविकास खाते होते. गुलजार इंदर चहल यांनी पंजाब काँग्रेसच्या कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. सात दिवसांपूर्वी २१ सप्टेंबरला चरणजीत सिंग चन्नी यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तेव्हा गुलजार इंदर चहल यांची औपचारिकपणे प्रदेशचे कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय, योगिंदर धिंग्रा यांनी पंजाब काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देऊन नवज्योतसिंग सिद्धू यांना समर्थन दिले आहे. मंत्री रझिया सुलताना आणि प्रदेश पक्षाचे कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल यांच्यानंतर पदाचा राजीनामा देणारे धिंग्रा हे तिसरे काँग्रेस नेते आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times