दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील खडीपट्टा परिसरात शिरवणे खाडित अधिकृत वाळू उत्खनन करण्यासाठि वापरलेल्या बेकायदा असलेला सक्शन पंप बसवलेली बोट व वाळू डेपोच्या ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आल्याने खाडिपट्टा विभागात खळबळ उडाली आहे. एकूण दोन लाख साठ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दापोली तालुक्यात दाभिळ येथील संशयित आरोपी अलीम अ.रहेमान दळवी याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ( cracks down on )

महसूल विभागचे देगाव येथील मंडळ अधिकारी संतोष पारदुले यांनी दापोली पोलीसात फिर्याद दाखल केली आहे. खनिकर्म अधिकारी रत्नागिरी यांचे आदेशाने ही करवाई करण्यात आली आहे. दाभिळ कोडजाई नदी पात्रात शिरवणे खाडित संशयित आरोपीने शासनाने संक्शन पंपाद्वारे रेती काढणेबाबत बंदी घातलेली असतानाही बोटीने वाळू उपसा करुन चोरीचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने वरील ठिकाणी रजिस्ट्रेशन न केलेल्या व संक्शन पंप बसविलेल्या बोटी वाळू उपसा करणेसाठी वापरल्याचे घटनास्थळी आढळल्याने ही मोठी करवाई करण्यात आली आहे.

यामध्ये ६० हजार रुपये किमतीची उभी असलेली पंप बसविलेली बोट, लोखंडी पाच पाईप व नऊ ड्रम, दोन लाख रुपये किमतीची पंप बसविलेली बोट ( रजीस्ट्रेशन नसलेली) निनावी बोट हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे डिसेंबर २०२० रोजी पासून यावर्षी २ सप्टेंबर २०२१ पर्यंत हा सगळा वाळू चोरीचा प्रकार चालू होता. २८ सप्टेंबर रोजी सोमवारी उशीरा दापोली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल दहा महिने ही कथित वाळू चोरी सुरु होती ही माहिती पुढे आली आहे. मात्र, या विभागातील याला कोणाचा वरदहस्त होता? हा प्रश्न उपस्थित होत आहे. भा.दं.वि.क. ३७९, ५११ प्रमाणे हा गुन्हा या प्रकरणातील संशयित आरोपी अलीम अ.रहेमान दळवी याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत. (Dapoli revenue department cracks down on illegal sand traders)

(Dapoli revenue department cracks down on illegal sand traders)

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here