म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः आऱेमध्ये युनिट नंबर ३जवळ लहान मुलावर झालेल्या बिबळ्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या तीन दिवसांनी बुधवारी सायंकाळी ७.४५च्या सुमारास फुलपाखरू उद्यानजवळच्या वस्तीमध्ये एका महिलेवर बिबळ्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये महिलेच्या हातावर तसेच मानेवर आणि चेहऱ्यावर बिबळ्याची नखे लागली असून त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. ही संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध झाले आहे.

वाचा:

ही महिला घरासमोरच्या ओसरीवर बसली असतानाच बिबळ्याने हल्ला केला. महिलेने हातातील काठीने त्याला मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा बिबळ्या पळून गेल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसते, अशी माहिती त्यांचे शेजारी अॅड. भूपेश सिंग यांनी दिली. मुंबई वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश भोईर यांनी रविवारी युनिट ३जवळ लहान मुलाला उचलून नेण्याचा प्रयत्न करणारा बिबळ्या आणि बुधवारी हल्ला करणारा बिबळ्या एकच असू शकतो, असा अंदाज वर्तवला. बुधवारी हल्ला करणारा बिबळ्या हा पूर्ण वाढ झालेला बिबळ्या नाही. त्यामुळे त्याला कदाचित दोन्ही वेळा लहान मूल आणि ज्येष्ठ महिला ही सोपी शिकार वाटली असावी, असाही त्याच्या वर्तणुकीचा अंदाज त्यांनी बांधला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here