बीड : गुलाब चक्रीवादळामुळे राज्यभर मुसळधार पाऊस झाला. अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती ओढावली. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे गावांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे नागरिकांची जनजीवनही विस्कळीत झालं. गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्याला मोठा फटका बसला. मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं. अनेक शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मात्र, अद्यापही मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यावरून पंकजा मुंडे यांनी राज्य राज्य सरकारकडे मदतीची मागणी करत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुसळधार पावसाचा फटका बसल्यामुळे परळी तालुक्यात पंकजा मुंडे यांनी भरपावसात दौरा केला. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आणि ग्रामस्थ शेतकऱ्यांना धीर दिला. या दौऱ्या वेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. पालकमंत्री पूरग्रस्त जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला गेले आहेत असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका केली.

इतकंच नाहीतर दरवेळी केंद्राकडे बोट दाखवणं अयोग्य नाही. राज्य सरकार हे पालक आहेत. केंद्र सरकार हे ग्रँड पेरेंट्स आहेत. त्यामुळे ते त्यांची जबाबदारी ओळखतात. पण पालकांनी त्यांची जबाबदारी पूर्ण करायला हवी असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here