नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेता केंद्र सरकारने अल्प बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. सलग दोन तिमाही व्याजदर ‘जैसे थे’च ठेवल्याने कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. १ आॅक्टोबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या तिसऱ्या तिमाहीत , , सुकन्या समृद्धी योजनेसह इतर अल्प बचतीच्या योजनांचे व्याजदर दुसऱ्या तिमाही प्रमाणेच स्थिर राहणार आहेत.

अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून काल गुरुवारी ३० सप्टेंबर रोजी रात्री अल्प बचत योजनांचे तिसऱ्या तिमाहीतील व्याजदरांचे परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार या गुंतवणूक योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहिल्या तिमाहीत सरकारने अल्प बचतीच्या विविध योजनांच्या व्याजदरात कपात केली होती. तर दुसऱ्या तिमाहीमध्ये सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीसह (पीपीएफ) सर्व अल्पबचत योजनांचे व्याजदर पहिल्या तिमाहीप्रमाणेच ठेवले होते.

अल्प बचतीच्या गुंतवणूक योजनांचे व्याजदर १ आॅक्टोबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत कायम राहतील. त्यानुसार ‘पीपीएफ’वर ६.४ टक्के व्याज मिळेल. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवरील (NSC) ५.९ टक्के व्याजदर आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर ६.९ टक्के व्याज आहे. बचत ठेवीचा व्याजदर ३.५ टक्के आहे. पोस्टाच्या मुदत कालावधीच्या ठेवींवर (Post Office Time Deposit) ४.४ टक्के ते ५.३ टक्क्यांच्या दरम्यान व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याजाचा दर ६.५ टक्के आहे. किसान विकास पत्रावर ६.२ टक्के व्याज मिळेल.

करोना संकटात गेल्या वर्षी सलग तीन तिमाहीत सरकारने अल्प मुदतीचे व्याजदर स्थिर ठेवले होते. त्यानंतर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ‘पीपीएफ’सह इतर अल्प बचतीच्या योजनांवरील व्याजदरात मोठी कपात केली होती. यामुळे ‘पीपीएफ’चा व्याजदर १९७४ नंतर प्रथमच ७ टक्क्यांखाली घसरला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here