गेल्या महिन्याभरात एका बिबट्याने आरे कॉलनीत हैदोस घातला होता. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या महिन्याभरात बिबट्याने पाच जणांवर हल्ला केला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी एका घरासमोरच्या अंगणात बसलेल्या महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्या नंतर या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली होती.
वाचाः
अखेर वनविभागानं तातडीने पावलं उचलत या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला होता. वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्री जागता पहारा ठेवला होता. आज पहाटे ३च्या सुमारास बिबट्या सापळ्यात अडकला आहे. आरे युनिट नंबर ३ मध्ये वनखात्याने ही कारवाई केली आहे.
वाचाः
दरम्यान, आरेतील नागरिकांवर हल्ला करणारा हाच बिबट्या आहे का याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलं नाहीये. वैद्यकीय तपासणीनंतरच याबाबत स्पष्टता होईल.
वाचाः
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times