याबाबत अधिक माहिती अशी की, कबनूर येथील सिकंदर मुल्ला हा मिळेल ते काम करून कुटुंबासमवेत राहत आहे. तो अपंग असल्यामुळे त्याच्या कमाईवर मर्यादा आहेत. शिवाय त्याला दारूचे व्यसन आहे. यामुळे घरात सातत्याने वाद होत होता. त्याचा पाच वर्षाचा मुलाला याला वारंवार फिट्स येतात, त्यामुळे त्याच्या औषध उपचारावर बराच खर्च करावा लागतो.
वाचाः
सिकंदर घरी पैसे देत नसल्यामुळे कुटुंबात सातत्याने वाद होत होता. यातून तो सतत घराबाहेर राहत होता. काल सायंकाळी सिकंदर घरात आल्यानंतर त्याला किमान मुलाच्या औषधोपचाराचा तरी खर्च कर म्हणून घरातल्या व्यक्तींनी सुनावले. त्यानंतर उपचारासाठी घेऊन जातो म्हणून सिकंदरने मुलास सायकलवरून गावात नेले. त्याला इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत फेकून दिले. घरी येऊन त्याने ही गोष्ट पत्नीला सांगितली.
या घटनेवर त्यांचा विश्वास बसला नाही. बराच वेळ शोधाशोध करूनही मुलगा न सापडल्याने अखेर शाहूनगर पोलिसात त्यांनी धाव घेतली. तेव्हा या निर्दयी बापाने मुलाला नदीत फेकल्याची कबुली दिली. रात्री उशिरा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही त्या मुलाचा शोध लागला नाही. सकाळी पुन्हा पंचगंगा नदीत त्याला शोधण्याचे काम सुरू आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.
वाचाः
बापानेच मुलाला नदीत फेकल्याची ही तिसरी घटना आहे. गेल्या काही दिवसात घडत असलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times