बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. कार चालकाने कार सुरू असतानाच अचानक युटर्न घेतला. यावेळी समोरुन दुचाकी येत होती. मात्र, कारने अचानक युटर्न घेतल्यानं कारचा दुचाकीला धक्का लागला. त्यामुळं तरुण थेट दुचाकीसह सपरटत पुढे गेला. त्याच वेळी त्यासमोरुन येणारा दुचाकीस्वारही गोंधळला. या अपघातानंतर कारचालक थांबला नाही. त्याने कार युटर्न घेतली आणि तिथून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
वाचाः
या अपघातानंतर दोन तरुणांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या सर्व घटनेनंतर कार चालक फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारची नंबरप्लेट अस्पष्ट दिसत असल्यानं या कार चालकाचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times