चांदूर रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र एक्सप्रेस, हावडा – अहमदाबाद एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, कुर्ला एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता चांदूरवासी आक्रमक होतांना दिसत आहे. सर्व रेल्वे गाड्यांना स्थानिक स्टेशन वर थांबा देण्यात यावा, अन्यथा स्टेशन बंद करण्यात यावे यासाठी २ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीदिनी चांदूर रेल्वे स्टेशन मास्तर यांना कुलूप भेट देणार आहे.
साधा कुलुप भेट देणार असून सोबत तब्बल १० फुटांचा प्रतिकात्मक कुलुप सुध्दा भेट देणार आहे. ८ दिवसांपासून चांदूर रेल्वे शहरात सदर कुलुप तयार होत असुन या प्रतिकात्मक कुलुपसह २ ऑक्टोंबर ला भव्य मिरवणुक निघणार आहे. या कुलुपची चाबी सुध्दा चक्क तीन फुटांची बनविण्यात आली आहे. त्यामुळे या कुलुपाची चांदूर रेल्वे शहरात चांगलीच चर्चा रंगत असुन सदर आंदोलनात मोठ्या संख्येने शहरवासी सहभागी होण्याची शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times