म. टा. प्रतिनिधी ।

हात उसने पैसे परत मगितल्याच्या कारणावरून मित्रानेच जिवलग मित्राचा पेट्रोल टाकून जाळल्याचे प्रकार समोर आला असून, गुरुवारी रात्री उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. पेट्रोल टाकण्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजता घडली. संकेत विहार येथील विहिरी शेजारी घडली. या प्रकरणी हडपसर (Hadapsar) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संतोष दादाराव कागदे ( वय ५१ रा.आंबेगाव, ता. हवेली , मूळ रा.ढोकी, उस्मानाबाद ) असं मृत्यू झालेल्याचं नाव आहे. आरोपी मनोज मोहन कांदे ( वय २८ संकेत विहार, फुरसुंगी ) याला अटक केली आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संतोष कागदे हे दोघे चांगले मित्र होते. संतोष सुरक्षा राक्षकाचं काम करत होते. मनोजला दहा लाख रुपयांची गरज असल्यानं त्यानं संतोषकडं पैशाची मागणी केली होती. मनोज हा चांगला मित्र आहे, त्याची काही तरी अडचण असेल असे समजून संतोषनं एक वर्षात पैसे परत देण्याच्या शब्दावर त्याला पैसे दिले. मात्र, एक वर्ष उलटून गेल्यानंतरही मनोज पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. अखेर २९ सप्टेंबरला मनोजनं संतोष पैसे देतो असं सांगून संतोषला हडपसर इथं बोलावून घेतलं. ते दोघेही दिवसभर सोबत राहिले. रात्री जेवण केलं. उशीर झाल्यानं संतोष मनोजच्याच घरी झोपला. सकाळी उठल्यावर मनोजनं संतोषला दुचाकीवर बसवून संकेत विहार येथील विहिराच्या शेजारी नेलं. मी तुझे पैसे देऊ शकत नाही. मी तुला पेट्रोल टाकून जाळून खल्लास करतो, असं म्हणत त्यानं संतोषच्या अंगावर बाटलीतील पेट्रोल टाकलं आणि काडीपेटीनं जाळ लावून पळून गेला. अंगाला आग लागल्यानं संतोष ओरडत पळत सुटला. त्या दरम्यान तो खाली पडला, नागरिकांनी त्याला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केलं. मात्र, ८० टक्के भाजल्यानं त्याचा गुरुवारी रात्री उपचार दरम्यान मृत्यू झाला.

आणखी वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here