मुंबई: अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पाणीपुरवठा मंत्री () यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टोला हाणला होता. गुलाबरावांच्या या टीकेला मनसेचे नेते यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत उत्तर दिलं आहे. खोपकर यांनी गुलाबराव पाटलांना संबंध संवेदनाहीन ‘गुलाब’ चक्रीवादळाची उपमा दिली आहे.

राज्यात घोंगावलेलं गुलाब चक्रीवादळ व त्यानंतर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत दिली जावी, अशी मागणी विरोधकांकडून सरकारला केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यावर गुलाबराव पाटील यांनी नाशिकमध्ये प्रतिक्रिया दिली होती. ‘राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य. मागणी करणं सोपं आहे, मात्र निर्णय पंचनाम्यानंतर होईल. परिस्थिती पाहून दुष्काळ जाहीर केला जाईल. राज ठाकरे यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. कुणीही राजकारण करू नये,’ असं पाटील म्हणाले होते.

वाचा:

गुलाबराव पाटलांच्या या टीकेला मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून अत्यंत बोचऱ्या शब्दांत उत्तर दिलं आहे. ‘गुलाब चक्रीवादळामुळं समजलं की गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे ते. राजसाहेब यांनी केलेली मागणी सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य आहे, पण संवेदनाहीन ‘गुलाब’ना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार? भ्रष्टाचाराचा महापूर आणि अकलेचा दुष्काळ असलेले नेते आपल्याला मिळाले हेच तर आपलं दुर्दैव आहे,’ अशी टीका खोपकर यांनी केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here