कर्जत-जामखेड, राहुरी, पारनेर आणि नगर तालुक्यात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आणखी काही प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. यातील अनेक जण खासदार विखे, माजी मंत्री राम शिंदे, शिवाजी कर्डिले यांचे समर्थक असल्याचे मानले जात होते. यासंबंधी पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे यांनी या पक्षांतराला फारसे महत्त्व देत नसल्याचे स्पष्ट केले.
वाचा:
ते म्हणाले, ‘निवडणुका जवळ आल्याने हे प्रकार सुरू आहेत. अशा पक्षांतरामुळे ना कुठला पक्ष वाढतो, ना कोणा पक्षाचे नुकसान होते. पदांच्या अपक्षेने ही पक्षांतरे होतात, हे सर्वांनाच ठावूक आहे. सामान्य कार्यकर्ते आणि नागरिक पक्षासोबत राहतात. त्यांच्या जोरावर निवडणुका लढविल्या जातात. त्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष अन्य पदाधिकारी यांनी पक्ष बदलले तरी आम्हाला फरक पडणार नाही, हे मी लिहून देतो. आज कितीही पक्षांतरे होऊ द्या, जेव्हा निवडणुकांचा निकाल येईल, तेव्हा लोकांनी आमच्याच बाजूने कौल दिल्याचे आढळून येईल. त्यामुळे याला आम्ही फारसे महत्त्व देत नाही. आम्ही आमचे काम करीत आहोत. जी आश्वासने दिली, त्यांची पूर्तता सुरू आहे. जे करायचे ते जनतेसमोर आहे. याची आम्ही जाहिरातबाजी करीत नाही. सोशल मीडियातून काम केल्याचा आवही आणत नाही. तसे करण्याची आम्हाला गरजही वाटत नाही. आमची नाळ सामान्य माणसाशी जोडलेली आहे. त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे कोण कोठे गेला? का गेला? यावर आमच्या कामाचे मूल्यमापन अवलंबून नाही,’ असेही विखे म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times