पुणे: पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार उडवला. या अतिवृष्टीमुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेऊन तातडीची मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी राज्य सरकार आठवड्याभरात निर्णय घेणार आहे. ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे. (dy cm said that a decision will be taken within a week to compensate the farmers)

उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर असून येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदतीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. राज्यात लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून अजूनही हजारो एकर शेती पाण्याखाली आहे. या अतिवृष्टीमध्ये सोयाबीनबरोबरच कपाशीच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे हवालदिल झाला असून सरकार केव्हा मदत देईल याची तो वाट पाहत आहे. शिवाय विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही सरकारवर ताशेरे ओढत तत्काळ मदत देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीने ही मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर पुढच्याच आठवड्यात मदतीबाबत निर्णय घेण्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
राज्यात झालेले नुकसान पाहता विमा कंपन्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना विम्याची रक्कम द्यावी, अशा सूचन विमा कंपन्यांना देण्यात आल्याची माहितीही अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. यावेळी पवार यांनी विरोधंकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
शेतकरी संकटात असताना राष्ट्रवादीचे मंत्री संवाद यात्रेत फिरत होते. त्यांना शेतकऱ्यांचा अजिबात कळवळा नाही. त्यांना पक्ष, सत्ता महत्त्वाची आहे, अशी टीका विरोधी पक्षाचे नेते करत होते. त्यावर अजित पवार म्हणाले की, राज्यात होत होती तेव्हा आमचे मंत्री मराठवाड्यातच होते. जराही वेळ न दवडता मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. हे पाहता विरोधकांचे आरोप बरोबर नाहीत. त्यामुळे मंत्री फिरकलेच नाहीत, असे जे विरोधक बोलत आहेत ते योग्य नाही. संबंधित मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरेच केले आहेत, असे पवार म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here