याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरच्या महसूल भवनाच्या छतावर अनिकेत हरीष चांदेकर हा युवक आपले काका संजय चांदेकर ह्यांच्या बरोबर सी सी टीव्ही केबल टाकण्याचे काम करायला गेला होता. दरम्यान अचानक विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरू झाला. काही कळायच्या आत महसूल भवनावर काम करत असलेल्या अनिकेतच्या डोक्यावरच .
क्लिक करा आणि वाचा-
या आघाताने त्याच्या डोक्यावर जखम झाली होती व त्याचा मोबाईल सुद्धा फुटला होता. अनिकेत हा आपल्या काकांसोबत जुनोना चौक, बाबुपेठ येथे काही दिवसांपासून राहत होता. आजचा त्याच्या कामाचा पाहिलाच दिवस होता हे विशेष.
क्लिक करा आणि वाचा-
ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी छतावर धाव घेतली. या नागरिकांनी जखमी अवस्थेतील अनिकेतला तत्काळ दवाखान्यात पाठविले. मात्र, दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times