वाचा:
जयंत पाटील यांच्या परिवार संवाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू आहे. यादरम्यान निफाड येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी महत्त्वाची राजकीय विधाने केली. ‘भविष्यात व या दोन्ही पक्षांसोबत मिळून आपल्याला काम करायचे आहे. मागील वेळी काँग्रेस हा मोठा भाऊ होता व आपण लहान होतो. यावेळी मात्र काँग्रेस लहान भाऊ आहे आणि आपण मोठे भाऊ आहोत. असे असले तरी आघाडीत लहान-मोठा असं काही नसतं, आपल्याला एकमेकांच्या सोबतीने काम करायचे आहे’, असे नमूद करत महाविकास आघाडी येणाऱ्या काळातही भक्कम असेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आपल्याला कार्यकर्ता वैचारिकदृष्ट्या उभा करण्याची गरज आहे. विचारांवर आधारित कार्यकर्ते निर्माण केले असते तर भाजपात जाणारेही भुलथापांना भुलले नसते. वैचारिक लोकांची वानवा कार्यकर्त्यांमध्ये असल्याने भाजप सत्तेत आला होता, असे सांगत पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यांना एकनिष्ठ राहण्याचे आवाहन केले. पक्ष सत्तेत आल्यावर लोकांच्या मागण्या काय आहेत, अपेक्षा काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी ही परिवार संवाद यात्रा काढली आहे, असेही त्यांनी सांगितले.
निफाडनंतर पाटील यांचा सिन्नर येथे मेळावा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयी मतदारसंघ नसलेल्या ठिकाणीही पक्षाचे कार्यकर्ते अनेक अन्याय सहन करून शरद पवार यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी राष्ट्रवादीबरोबर आहेत हे मी संपूर्ण महाराष्ट्रभर पाहतोय. त्या सर्वांना न्याय मिळावा यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधत असल्याचे यावेळी पाटील म्हणाले. सिन्नरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार हे मला इथे प्रचाराला आलो तेव्हाच कळलं होतं. सिन्नरकरांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासास ते पात्र ठरत आहेत. सिन्नरचा झपाट्याने होणारा विकास हे त्याचे उदाहरण आहे, असेही पाटील म्हणाले. माणिकराव कोकाटे यांनी या भागाचा विकास करण्याचा ध्यास घेतला आहे, शासनातर्फे त्यांना संपूर्ण सहकार्य केले जाईल, असा शब्दही जयंत पाटील यांनी दिला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times