शेलार पत्रकार परिषदेत बोलत होते. यापूर्वी त्यांनी ६ सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन कोस्टल रोडच्या कामात १००० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्याला तातडीने त्याच दिवशी मुंबई महानगरपालिकेने खुलासा करून उत्तर दिले होते. या खुलाशामध्ये महापालिकेने, या कामात कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार व अनियमीतता न झाल्याचा दावा केला होता. त्यावर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आमदार शेलार यांनी पुन्हा भ्रष्टाचाराचे आरोप केले. आपण हे आरोप पुराव्यानिशी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
याबाबत बोलताना ते म्हणाले की, हा भाजपाचा ड्रिम प्रकल्प असून मुंबई शहराला त्याची गरज आहे. म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या परवानग्या तातडीने मिळवून दिल्या. त्यानंतर मात्र ज्या पध्दतीने काम सुरू आहे त्यावरून कामाचा दर्जा निष्कृष्ट दर्जाचे असून या प्रकल्पाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. या प्रकल्पाला भाजपाचा विरोध नसून यातील भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबई महापालिकेतील सत्ताधारी गेले अनेक वर्षे मुंबईतील गल्लीतील रस्त्यांचे डांबरीकरण करून कटकमिशनचा व्यवहार करत आहेत. तीच कार्यपध्दती याच आंतराष्ट्रीय प्रकल्पाच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांची असल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केला आहे. या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कन्सल्टंट कंपन्यांनी निकृष्ट दर्जाचा माल भरावासाठी घेतला, असा आरोप शेलार यांनी केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
कंन्सल्टनेने कुठल्या दर्जाचा माल भरावासाठी घेण्यात यावा, तसेच कुठल्या खाणीतून हा माल घेण्यात यावा यासाठी प्रमाणीत खाणीच्या याद्या देण्यात आल्या. मालाची घनताही ठरवण्यात आली. प्रत्यक्षात मात्र कंन्सल्टनेने ठरवून दिलेल्या खाणीतील माल न घेता तो अन्य खाणीतून निकृष्ठ दर्जाचा माल घेण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे व प्रकल्पाला धोका निमाण झाला आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times