: युवकाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला गर्भवती केले आणि नंतर दोनदा तिचा गर्भपात करून लग्नास नकार दिल्याची घटना नागपुरात घडली आहे. याप्रकरणी तरुणीने कळमना पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

रोशन अनिल ठाकरे (वय २९, रा. ओमनगर) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय तरुणी महाविद्यालयातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. फेसबुकवर तिची रोशन या तरुणासोबत ओळख झाली. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर रोशनने तिला लग्नाचे आमिष दाखवलं. सप्टेंबर २०२० मध्ये तरुणीचा वाढदिवस होता. त्यावेळी रोशनने तिला पचमढी येथे नेले आणि तेथे दोघांत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतरही ते सुरूच होते.

दरम्यान, तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर आरोपी रोशन याने तिला गर्भपाताचे औषध दिलं. पुढील काळात तो तिच्यावर अत्याचार करू लागला. तरुणी पुन्हा गर्भवती राहिली. रोशनने पुन्हा तिला गर्भपाताचे औषध दिलं. तरुणीशी संबंध तोडण्यासाठी ती ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार रोशनने हुडकेश्वर पोलिसांत दिली. याबाबत कळताच तरुणीने कळमना पोलीस स्टेशन गाठले.

रोशनने अत्याचार करून बळजबरीने दोनवेळा गर्भपात करण्यास बाध्य केल्याची तक्रार तरुणीने दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून रोशनचा शोध सुरू केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here