मुंबई: मुंबईच्या समुद्रात गोव्याला निघालेल्या एका मोठ्या क्रूझवर मुंबईच्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मोठी कारवाई करत करणाऱ्यांना अटक केली. या प्रकरणी एकूण १० जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त असून ताब्यात घेतलेल्यांमध्ये बॉलिवूडच्या एका मोठा अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश आहे. एनसीबीची ही कारवाई अतिशय गुप्तपणे सुमारे ७ तास सरू होती अशी माहिती मिळत आहे. एनसीबीने अशा प्रकारे एका मोठ्या क्रूझवर केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. ( on mumbai goa cruise 10 arrested with a son of bollywood actor)

मुंबई-गोवा क्रूझमध्ये ड्रग पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला प्राप्त झाली होती. त्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबीचे एक पथक या क्रूझवर पोहोचले. मात्र ही क्रूझ समुद्राच्या मध्यमागी पोहोचल्यानंतर सुरू झाली. या पार्टीत उपस्थित लोक खुलेआम ड्रगचे सेवन करत होते. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने कारवाई सुरू केली.

क्लिक करा आणि वाचा-
एनसीबीच्या पथकातील कर्मचारी क्रूझवर प्रवासी बनून गेल्याने कोणालाही त्यांचा संशय आला नाही. या पथकाने ड्रगचे सेवन करणाऱ्यांना रंगेहात पकडले.

एनसीबीच्या या ऑपरेशनदरम्यान एका बॉलिवूडच्या अभिनेत्याच्या मुलाला अटक घेण्यात आले आहे. त्याच्यासोबत एकूण १० जणांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीने केलेली ही कारवाई मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. याचे कारण म्हणजे एनसीबीने अशा प्रकारे पहिल्यांदाच एखाद्या क्रूझवरच्या मोठ्या ड्रग पार्टीचा पर्दाफाश केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या क्रूझचे उद्घाटन काही दिवसांपूर्वीच करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला असल्याचेही सांगण्यात येत आहे.

पार्टीचे तिकीट ८० हजार रुपये

दिल्लीच्या Namascray Experience या कंपनीने या पार्टीचे आयोजन केले होते, असे वृत्त आजतकने दिले आहे. या क्रूझवर प्रवास करण्यासाठी ८० हजार इतकी तिकिटाची किंमत ठेवण्यात आल्याचे वृत्त आजतकने दिले आहे. ही पार्टी आज (शनिवारी) सुरू झाली होती आणि सर्वजण सोमवारी ४ ऑक्टोबरला मुंबईत परतणार होते.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here