लाइव्ह अपडेट्स:
>> शिवसेनेनं सरकार बनविण्यासाठी कोणकोणत्या मुद्द्यांवर सेटिंग केलीय हे एकदा स्पष्ट करावं, फडणवीसांचा हल्लाबोल
>> मुस्लिम आरक्षणाच्या घोषणेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर टीका
>> मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयामुळं ओबीसी व मराठा समाजाच्या आरक्षणावर परिणाम होणार – फडणवीस
>> धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद राज्यघटनेतच नाही – फडणवीस
वाचा:
>> मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच अध्यादेश काढणार – अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची विधान परिषदेत माहिती
>> काही जिल्ह्यांत आजही ओबीसींनी पुरेसं आरक्षण नाही – विजय वडेट्टीवार यांची माहिती
>> देशाच्या पंतप्रधानांना जात नसते. पण योगायोगानं पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत. आपण त्यांच्याकडं जाऊन विनंती करणं गरजेचं आहे – फडणवीस
>> ओबीसीच्या वेगळ्या जनगणनेला भाजपचा पाठिंबाच आहे. त्यासाठी पंतप्रधानांकडं धोरणात्मक प्रस्ताव घेऊन जाऊ – देवेंद्र फडणवीस
वाचा:
>> ओबीसींची वेगळी जनगणना व्हायलाच हवी. वंचितांच्या मदतीसाठी त्याची आवश्यकता आहे. हा राजकारणाचा प्रश्न नाही – छगन भुजबळ यांची मागणी
>> आज आपल्याकडं मनुष्यबळ आहे. कम्प्युटरसारखं तंत्रज्ञान असताना जातीनिहाय जनगणनेला नेमकी काय अडचण आहे – छगन भुजबळ यांचा सवाल
>> जातीनिहाय जनगणनेची मागणी १९९० पासून होतेय – छगन भुजबळ
>> ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेवरील ठरावावर चर्चेला सुरुवात
>> जातीनिहाय जनगणनेवर विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांचं निवेदन
वाचा:
वाचा:
>> शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता
वाचा:
>> विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनचा आज पाचवा दिवस.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times