मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने शनिवारी कॉर्डेला द इम्प्रेस नावाच्या क्रूझ शिपवर छापेमारी केली. येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीत जे लोक उपस्थित होते, त्यात बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या मुलाचाही समावेश होता. पार्टीत उपस्थिती सर्वांच्या रक्ताचे नमूने एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी घेतले आहे, आणि आता ते त्याच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. असे मानले जात आहे की, रविवारी कोणत्याही क्षणी एनडीपीएस कायद्यानुसार अनेकांना अटक केली जाऊ शकते.

दिल्लीतील आयोजक कंपनी देखील दोषी
!

या क्रूझ शिपमध्ये डीजेला देखील निमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांच्याकडूनही सादरीकरण होणार होते. यावेळी पूल पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले होते. दिल्लीतील एका कंपनीने या क्रूझ शिपमध्ये संपूर्ण पार्टीचे आयोजन केले होते, त्यामुळे आयोजकांना देखील या रेव्ह पार्टीमधील आरोपींमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.

रिक्त जागांची तिकीटे बूक करुन पोहोचले एनसीबीचे अधिकारी

अगोदर अशी माहिती समोर आली होती की, क्रूझ शिप दोन ते चार ऑक्टोबर दरम्यान मुंबई ते गोवा प्रवासाकरिता बूक करण्यात आले होते. मात्र एनसीबीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्रूझ शिप मुंबई येथून दोन ऑक्टोबरला दोन वाजता निघणार होते आणि गोव्याला जाण्याऐवजी सागरी प्रवास करुन तीन ऑक्टोबरला पुन्हा मुंबईला परतणार होते. याबाबत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यांनी त्याबाबत तपास केल्यावर त्यांच्या हे लक्षात आले की, या क्रूझ शिपची जवळजवळ सर्वच तिकीटे ऑनलाईन बूक झाली होती. काही जागा शिल्लक होत्या. एनसीबीच्या पथकाने या क्रूझमधील सर्व शिल्लक जागा बूक करुन शिप गाठले.

जेव्हा हे क्रूझ शिप मुंबईहून आपल्या प्रवासाला निघाले, तेव्हा काही वेळेतच एनसीबीने आपल्या कारवाईला सुरुवात केली. या शिपमध्ये सुमारे एक हजार प्रवासी होते, मात्र आता आलेल्या ताज्या माहितीनुसार, एकूण प्रवाशांपैकी एनसीबीतर्फे केवळ बारा व्यक्ती दोषी आढळल्याचे समोर येत आहे.

यापूर्वी देखील अडकले आहेत स्टार
मुंबईमध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन होणे तसे नवीन नाही. मुंबई पोलिस विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील जेव्हा मुंबईतील पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त होते, तेव्हा त्यांनी रेव्हा पार्टीवर छापेमारी केली होती. यातील एका पार्टीत बॉलिवूडमधील एका खलनायकाचा मुलगा देखील अडकला होता. तेव्हा त्या खलनायकाने म्हटले होते की, त्याचा मुलगा अंमली पदार्थांचे सेवन करुच शकत नाही, अशी मी शपथ घेतो. त्यानंतर वैद्यकीय अहवालानुसार त्या खलनायकाच्या मुलाला निर्दोष सोडण्यात आले होते. मात्र त्या खलनायकाच्या मुलीला गेल्या वर्षीच एनसीबीने अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अंमली पदार्थांच्या प्रकरणात चोकशीसाठी बोलावले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here