shivlila patil left the bigg boss marathi: शिवलीला पाटीलनं घेतला बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय – shivlila patil left the bigg boss marathi due to medical reason
मुंबई: बिग बॉस मराठी 3 सुरू होऊन आता दोन आठवडे झाले आहेत. परंतु एकही स्पर्धत घराबाहेर गेला नाही. दोन्ही आठवड्यात एकही एलिमिनेशन झालं नाही. परंतु आज अचानक शिवलीला पाटील हिनं खेळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
बिग बॉसच्या घरात आल्यानंतर पहिल्याच आठवड्यात शिवलीलाची तब्येत बिघडली. त्यानंतर तब्येत बरी नसल्यामुळं तिला वैद्यकीय उपचारासाठी घराबाहेर पाठवण्यात आलं. परंतु तब्येतीत सुधारणा होत नसल्यानं बिग बॉसच्या घरात पुन्हा न जाण्याचा आणि या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय तिनं घेतल्याचं सांगितलं आहे. शिवलीला बाहेर पडल्यामुळे सध्या बिग बॉसच्या घरातील वोटिंग लाइन्स बंद करण्यात आल्या होत्या. BBM 3: कॅमेरावर दिसण्यासाठी खोटी वागू नको, महेश मांजरेकरांनी स्नेहाला सुनावलं
कोण आहे शिवलीला? कौटुंबिक जीवनातील वेगवेगळे प्रसंग, समाजातील वेगवेगळ्या गोष्टी, अधूनमधून विनोदाची पेरणी करत ती कीर्तन सादर करत असल्याने चांगला प्रतिसाद मिळतो. शिवलीलाची कीर्तनाची स्वतःची अशी वेगळी शैली आहे. सोशल मीडियावर तिला मानणारा एक मोठा वर्गही आहे.कमी वेळेत आणि कमी वयात शिवलीलाने आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times