हायलाइट्स:

  • मुंबई -गोवा महामार्गावर भीषण अपघात
  • अपघातात एकाचा मृत्यू
  • जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

खेड : मुंबई -गोवा महामार्गावर रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यात कशेडी टॅबच्या हद्दीत मौजे खवटी इथं हा अपघात झाला. या अपघातात सातारा जिल्ह्यातील फत्यापूर येथील पंकज भगवान घाडगे (वय ३९) याचा मृत्यू झाला आहे.

दापोली ते फत्यापूर जाणाऱ्या प्रवासी गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. टायर फुटल्यानंतर गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूस होळामध्ये गेली. यावेळी गाडीतील प्रवासी पंकज घाडगे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. जखमी पंकज घाडगे यांना उपचारासाठी खेड कळंबणी रुग्णालयात दाखळ करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वडिलांच्या हत्येप्रकरणी मुलगा अटकेत, पोलीस कोठडीत रवानगी

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस निरीक्षक बोडकर, उपनिरीक्षक समेल सुर्वे आदींनी अपघातस्थळी धाव घेतली आणि इतर जखमींना रुग्णालयात दाखल केलं. यावेळी गाडीत एकूण आठ प्रवासी होते. यापैकी किरण मनोहर घाडगे यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. राहुल सुदाम घाडगे (वय २९), आकाश दत्तात्रय काळंगे (वय २४), सचिन शिवाजी घाडगे (वय ३२),उदय सुधाकर घाडगे (वय ३२), गणेश देशमुख (वय २७), विनोद शंकर गाडगे (वय ३४) सगळे रा.फत्यापूर जि. सातारा यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. या सगळ्यांवर खेड कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे, कशेडी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम, सुजीत गडदे यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद करण्याचे काम खेड पोलीस स्थानकात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here