इस्लामाबाद: पँडोरा पेपरलीकच्या गौप्यस्फोटानंतर पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पाच वर्षांपूर्वी ‘पनामा पेपर लीकने जगभरात खळबळ उडवली होती. बड्या व्यक्तींनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून केलेली करचुकवेगिरी यामुळे समोर आली होती. आता पुन्हा एकदा ‘इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्स’ने (आयसीआयजे) ‘पँडोरा पेपरलीक’द्वारे आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. पँडोरा पेपर्स लीकमध्ये पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि विरोधकांच्या नावांचा समावेश आहे.

जगभरातून ११९ कोटी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा ‘आर्थिक गैरव्यवहार’ जगासमोर उघड झाला आहे. ११७ देशांतील ६०० पत्रकार ‘पॅंडोरा पेपर लीक‘च्या तपासात सहभागी होते, असे ‘आयसीआयजे’ने सांगितले.

पनामा पेपर्सनंतर आर्थिक गैरव्यवहाराचा ‘पँडोरा’ गौप्यस्फोट; जगभरात खळबळ
पँडोरा पेपरलीकमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळच्या लोकांसह लष्करी अधिकारी, विरोधी पक्षातील नेत्यांसह जवळपास ७०० जणांच्या नावांचा समावेश आहे. यांची मालमत्ता परदेशात शेल कंपन्यांच्या स्वरूपात असल्याचा आरोप आहे.

पाकिस्तान सरकारचे अर्थमंत्री शौकत तारिन, जलसंपदा मंत्री मुनिस इलाही, खासदार फैसल वावडा, उद्योग आणि उत्पादन मंत्री खुसरो बख्तियार यांच्या नावाचा समावेश आहे. तर, माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नातेवाईक इशाक डार, बिलावट भुट्टो यांच्या पीपीपी पक्षाचे शारर्जिल मेमन यांचीही नावे समोर आली आहेत. त्याशिवाय पाकिस्तानमधील काही निवृत्त लष्करी अधिकारी, व्यावसायिक आणि माध्यम कंपन्यांच्या मालकांच्या नावाचा समावेश आहे.

पँंडोरा पेपर्सने खळबळ; कर चुकवेगिरीसाठी श्रीमंतांची पळवाट, सचिन तेंडुलकरसह ३०० भारतीयांवर संशय
समोर आलेल्या दस्ताऐवजानुसार, इम्रान खान यांच्या जवळच्या लोकांनी आणि कुटुंबीयांनी गुप्तपणे आपले धन परदेशात गुंतवले. यामध्ये इम्रान खान यांना आर्थिक मदत करणाऱ्यांचाही समावेश आहे.

पँडोरा पेपरलीकचे स्वागत: इम्रान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पँडोरा पेपरलीकचे स्वागत केले आहे. या गौप्यस्फोटामुळे गैरमार्गाने संपत्तीचा संचय करणाऱ्या श्रीमंताचे सत्य समोर आणले गेले असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

इम्रान खान यांनी म्हटले की, कोणताही देश गरीब नसतो. मात्र, भ्रष्टाचारामुळे गरिबी निर्माण होते. मागील दोन दशकांपासून आपण याच मुद्यावर संघर्ष करत होतो.

श्रीलंकेतील बंदराचे कंत्राट अदानींना; भारताचा चीनला शह, अशी केली कुरघोडी
पाच वर्षांपूर्वी ‘पनामा पेपर लीकने जगभरात खळबळ उडवली होती. त्यानंतर आता पँडोरा पेपर्स लीक प्रकरण समोर आले आहे. पनामा पेपरमध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर पाकिस्तानमधील कोर्टात त्यांच्याविरोधात खटला चालला. यामध्ये शरीफ दोषी आढळले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here