हायलाइट्स:
- आर्यनने दिली गेली चार वर्ष ड्रग घेत असल्याची कबुली
- शाहरुखला होती आर्यनच्या या सवयीची माहिती
- मन्नत बंगल्याची देखील होणार झडती
एनसीबीच्या आर्यन खानवरील कारवाईवर सुनिल शेट्टीने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, त्याला…
शाहरुख आणि गौरीला माहीत आहेत मुलाच्या सवयी
एनसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने गेली चार वर्ष अंमली पदार्थ घेत असल्याचं कबुल केलं. आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट सोबत सतत अंमली पदार्थांचं सेवन करायचा. चौकशी दरम्यान, आर्यन सतत रडत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एनसीबीने आर्यनला शाहरुख आणि गौरी सोबत बोलण्याची परवानगी दिल्यावर आई- वडिलांसोबत बोलताना देखील तो रडत असल्याचं समोर आलं आहे. महत्वाचं म्हणजे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, शाहरुख आणि गौरीला आपल्या मुलाच्या सगळ्या सवयीची पूर्वीपासूनच माहिती होती.

शाहरुखच्या बंगल्यात झडतीसाठी टीम तयार
एनसीबी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शाहरुखच्या मन्नत बंगल्यात लवकरच सर्च ऑपरेशन करण्यात येऊ शकतं. झडती घेण्यासाठी एनसीबीकडून एक टीम तयार करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिम समुद्रालगत शाहरुखचा मन्नत बंगला असून तो पत्नी गौरी आणि मुलं आर्यन, सुहाना आणि अबरामसोबत मन्नतमध्ये राहतो. हा बंगला पर्यटकांचं आकर्षण आहे.
घटस्फोटानंतर सामंथाने नाकारली तब्बल २०० कोटींची पोटगी, कारण वाचून कराल कौतुक
या बंगल्याची सध्याची किंमत २०० कोटींच्या घरात आहे. लवकरच या बंगल्यावर छापेमारी सुरू करण्याचा एनसीबीचा मानस आहे. एनडीपीसी कायद्यानुसार प्रत्येक आरोपीच्या घरात शोधमोहीम घेण्याची तरतूद आहे. या कायद्यानुसार मन्नतमध्ये झडती घेण्यात येणार आहे. बंगल्यात काही सापडल्यास आर्यनच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times