हायलाइट्स:

  • आर्यनला होऊ शकते पोलीस कोठडी
  • एनसीबीने मागितली नाही आर्यनची कस्टडी
  • आर्यनने क्रूजवर केलं होतं अंमली पदार्थाचं सेवन

मुंबई– शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या आलिशान क्रूजवर धडक कारवाई करत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं. यात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश आहे. त्याच्यासोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही अटक करण्यात आली आहे. रेव्ह पार्टीमध्ये उपस्थित असल्याने अमली पदार्थाचं सेवन केल्याच्या संशयावरून आर्यनला एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. मात्र पुढील चौकशीत आर्यनने अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यानंतर एनसीबी आर्यनला न्यायालयासमोर उभं करणार आहे. आता अमली पदार्थांचं सेवन केल्याप्रकरणी आर्यनला कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे.

आर्यनला जामिन मिळणार! शाहरुखच्या मदतीसाठी धावले तेच वकील

आर्यनच्या मित्राकडे मिळाली चरस

शनिवारी आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर त्याला रविवारी एनसीबी ऑफिसमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने आर्यनला एक दिवसीय एनसीबी कोठडी सुनावली. या चौकशीदरम्यान आर्यनने अनेक धक्कादायक खुलासे केले. गेली चार वर्ष आपण अमली पदार्थांचं सेवन करत असल्याची कबुली त्याने एनसीबीला दिली. क्रूजवर आर्यनकडे कोणतेही अमली पदार्थ सापडले नसले तरी त्याने अमली पदार्थांचं सेवन केलं होतं ही गोष्ट वैद्यकीय चाचणीत समोर आली आहे.

आर्यन खान

या शिवाय आर्यनचा रूम पार्टनर असलेला अरबाज याच्या बुटांमध्ये चरस मिळाली आहे. ते दोघे एकाच रूममध्ये राहत असल्याने आर्यनच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोबतच शाहरुख आणि गौरी खान यांनाही आर्यनच्या अमली पदार्थांच्या सेवनाबद्दल माहीत असल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अमली पदार्थांचं सेवन केल्याचं सिद्ध झाल्यास होऊ शकते शिक्षा

या संपूर्ण प्रकरणात एनडीपीएस कायद्यानुसार कलम ८ क, २० ब, २७ आणि ३५ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांचा अर्थ आहे की आरोपींनी अमली पदार्थचं सेवन केलं, खरेदी केले आणि त्यांची विक्री केली. परंतु, आर्यनच्या बाबतीत त्याने अमली पदार्थांचं सेवन केलं. त्यामुळे फक्त अमली पदार्थ सेवन केल्याचं ध्यानात घेऊन न्यायालयाने आर्यनला शिक्षा दिली तर त्याला एका वर्षाचा तुरुंगवास किंवा २० हजारांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

आता त्यांचा माज उतरतोय… आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर विजय पाटकरांची परखड प्रतिक्रिया

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here