मुंबई: हार्बर मार्गावर चेंबूर आणि गोवंडी स्टेशनांदरम्यान रूळाला तडा गेल्याने या मार्गावरील लोकलसेवेचा बोजवारा उडाला आहे. युद्धपातळीवर रूळाची दुरुस्ती करण्यात आली असली तरी लोकलचं वेळापत्रक कोलमडून पडलं आहे. वाशी, पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हार्बर मार्गावरील लोकलसेवेला मोठा फटका बसला आहे. सध्या लोकल किमान ३५ मिनिटे उशिराने धावत असल्याचे ‘मटा’च्या वार्ताहराने सांगितले. चेंबूर ते वडाळा स्टेशनांदरम्यान लोकल बंचिंगची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोकल कासवगतीने मार्गक्रमण करत आहेत. ९ वाजून ५८ मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बेलापूर लोकल गुरु तेग बहादूर आणि चुनाभट्टी या स्टेशनांदरम्यान किमान २० मिनिटे एका जागी उभी होती, असे या लोकलमधील प्रवाशांनी सांगितले. लोकल रखडल्याने अनेक प्रवासी लोकलमधून उतरून रूळांवरून पायी चालत पुढचे स्टेशन गाठत आहेत.

रात्री १० वाजून १० मिनिटांच्या सुमारास रूळाला तडा गेल्याची माहिती मिळाली असून रेल्वेकडून अद्याप अधिक तपशील मिळालेला नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here