हायलाइट्स:

  • टॉलिवूड अभिनेता सिद्धार्थच्या ट्वीटमुळे मनोरंजन क्षेत्रात चर्चा
  • टॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी सामंथा-नागा चैतन्याचा घटस्फोट
  • दोघांच्या चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई: टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी वैवाहिक नात्यातून विभक्त होण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर काही तासांनंतर अभिनेता सिद्धार्थ याने एक ट्वीट केले. युजर्सनी या ट्वीटला घटस्फोटाच्या घोषणेशी जोडले आहे. सिद्धार्थ आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला की, ‘मी शाळेत शिक्षकाकडून जी पहिली गोष्ट शिकलो होतो, ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला दगा देणाऱ्याची कधीही भरभराट होत नाही. तुम्ही काय शिकलात?’.
‘कोर्डेला’क्रुझ प्रकरणात एनसीबीनं अटक केलेली मुनमून धमेचा नक्की आहे तरी कोण?
सिद्धार्थने ट्वीट केल्यानतंर चाहत्यांनी त्याचे हे ट्वीट सामंथा व नागा या दोघांच्या घटस्फोटाच्या घटनेशी जोडले आणि एकच चर्चा सुरू झाली. अनेक चाहते त्याच्या ट्विटमुळे नाराज झाले. काहींनी ‘आपल्या कामाशी काम ठेव’ असा सल्लाही सिद्धार्थला दिलाय. या ट्वीटचे घटस्फोटाशी खरेच काही देणेघेणे आहे की नाही, याबाबतही अनेक चाहत्यांनी चर्चा केली. एका चाहत्याने तर राग व्यक्त करत लिहिले की, “शेम ऑन यू. यावेळी असे करण्याची काय गरज आहे?, आरशासमोर उभे राहून स्वतःला हा प्रश्न विचार.”

सामंथा आणि सिद्धार्थ यांच्या संबंधांबाबत बोलायचे झाल्यास, काही वर्षांपूर्वी हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही एकमेकांना डेट करत होते. त्यादरम्यान सिद्धार्थने एका शोमध्ये अनेक गाण्यांवर नृत्यही केले होते. सामंथा प्रेक्षकांमध्ये बसून आनंद व्यक्त करत होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here