बीजिंग: चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने अमेरिका आणि युरोपच्या तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत, इंटरनेट क्षेत्रातील बड्या कंपन्यांच्या मालमत्तेवर बडगा उगारत राजकीय अंकुश लावला आहे.

दोन दशके कोणतीही बंधने नसल्याने, चीनमध्ये इंटरनेट कंपन्या फोफावल्या होत्या. मात्र, मक्तेदारीस विरोध आणि माहितीची सुरक्षा या मुद्द्यांवरून चीनने बड्या इंटरनेट कंपन्यांविरोधात गेल्या वर्षी, म्हणजेच सन २०२०च्या उत्तरार्धात मोहीम सुरू केली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याने बड्या कंपन्यांच्या बाजारमूल्याला धक्का बसला आहे. अलिबाबा हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, टेन्सेट ही गेम आणि सोशल मीडिया कंपनी; तसेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अन्य बड्या कंपन्या यांचे बाजारमूल्य १.३ लाख कोटी डॉलरने घटले आहे.

श्रीलंकेतील बंदराचे कंत्राट अदानींना; भारताचा चीनला शह, अशी केली कुरघोडी
मक्तेदारीच्या विरोधातील धोरणांची अंमलबजावणी ही सन २०२५पर्यंत प्राधान्याने केली जाणार आहे. या स्पर्धेमुळे रोजगारनिर्मिती होईल आणि लोकांचे राहणीमानही सुधारेल, असा दावा चीनमधील कम्युनिस्ट पक्षाने केला आहे.

पनामा पेपर्सनंतर आर्थिक गैरव्यवहाराचा ‘पँडोरा’ गौप्यस्फोट; जगभरात खळबळ
दरम्यान, चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांचे सरकार खासगी कंपन्यांनी, विशेषत: अलिबाबा आणि टेन्सेट यांनी लोकांकडून गोळा केलेल्या माहितीवरील नियंत्रणही वाढवत आहे. या दोन्ही कंपन्यांचे लक्षावधी वापरकर्ते आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here