दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १९ फेब्रुवारी रोजीच याबाबत संकेत दिले होते. देशद्रोहाच्या संबंधित गुन्ह्यात आरोपींवर खटला चालवण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यास संबंधित विभागाला सांगण्यात आले आहे, असे केजरीवाल म्हणाले होते. विशेष म्हणजे केजरीवाल यांचं हे विधान ज्यादिवशी आलं त्याचदिवशी दिल्लीतील एका न्यायालयाने दिल्ली सरकारला या प्रकरणात विचारणा केली होती. देशद्रोहाचा खटला चालवण्यास मंजुरी देण्याबाबतचा स्टेटस रीपोर्ट ३ एप्रिलपर्यंत सादर करा, असे न्यायालयाने सरकारला सांगितले होते. दिल्ली पोलिसांनी याबाबत सरकारला आठवण करून द्यावी, असेही न्यायालयाने नमूद केले होते.
दरम्यान, कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्यसह १४ जणांविरुद्ध १४ जानेवारी रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. ९ फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमात संबंधित आरोपींनी देशविरोधी घोषणांचे समर्थन केले व बेकायदा निदर्शने केली, असा आरोप सर्वांवर ठेवण्यात आला होता.
काय आहे प्रकरण?
संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फाशीविरोधात ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयू कॅम्पसमध्ये निदर्शने करण्यात आली होती. या निदर्शनांदरम्यान देशविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. या घोषणांचं समर्थन केल्याने कन्हैया, उमर, अनिर्बान यांना अटक करण्यात आली होती. या तिघांच्या अटकेनंतर देशभरात विविध विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये निदर्शने करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणात तिघांनाही नंतर जामीन मिळाला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times