पुणे : शहरात विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस (पुणे पावसाची बातमी) कोसळत आहे. सर्वत्र पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शहरात काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. परिणामी सदर परिसरात काही काळासाठी काळोख पसरला होता.

पुणे शहर आणि परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मेघगर्जनेसह होत असलेल्या पावसामुळे रात्री कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांचे चांगलेच हाल झाले.

corona latest updates: मोठा दिलासा! राज्यात करोना संसर्गाचा आलेख येतोय खाली; मृत्यू घटले

पुणेकरांना महापौरांचं आवाहन

पुण्यात कोसळत असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ‘पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा,’ असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे आधीच संकटात सापडलेला बळीराजा आणखीनच चिंतेत सापडला आहे.

या ६ जिल्ह्यांत पावसाचा इशारा

हवामान खात्याकडून लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि रायगड या जिल्ह्यांत आगामी काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here