हायलाइट्स:
- नवीन वीज कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी घेतली लाच
- वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यासह एजंटला अटक
- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपींना पकडले. दोघांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरपाडळे येथील व्यक्तीचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय असून त्याने गावातच एक नवीन गाळा भाड्याने घेतला आहे. व्यवसायाकरिता नवीन वीज कनेक्शन मंजुरीसाठी सात महिन्यापूर्वी देवाळे येथील एमएसईबी शाखेत रीतसर अर्ज केला आहे. नवीन वीज कनेक्शनसाठी कनिष्ठ अभियंता सनगर याने दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ईमेलवर तक्रार केल्यानंतर तक्रारीची पडताळणी केली असता कनिष्ठ अभियंता सनगर याने एक हजार रुपयांची लाच मागितल्याचं सिद्ध झाले. तसंच लाचेची रक्कम एजंट शेटे यांच्याकडे देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एजंट शेटे याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.
दरम्यान, सनगर आणि शेटे यांच्याविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक अदिनाश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहाय्यक फौजदार संजीव बंबरगेकर, विकास माने, नवनाथ कदम, कृष्णात पाटील, सूरज अपराध यांनी कारवाईत भाग घेतला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times