हायलाइट्स:

  • ७५ वर्षीय एस आर बालासुब्रमण्यम चर्चेत
  • गेल्या सात सत्रांत १०० टक्के उपस्थितीची नोंद
  • राज्यसभेतील कामकाजाच्या एकाही दिवशी अनुपस्थिती नाही

नवी दिल्ली : संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांतील सदस्यांची उपस्थिती हा अनेकदा चर्चेचा विषय ठरत असतो. परंतु, राज्यसभेच्या गेल्या सात सत्रांत १०० टक्के उपस्थिती दर्शवणारा एक नेता सध्या चर्चेचा विषय ठरलाय. राज्यसभेतील कामकाजाच्या एकाही दिवशी हा सदस्य अनुपस्थिती राहिलेला नाही. AIDMK सदस्य एस आर बालसुब्रमण्यम यांच्या राज्यसभेतील गेल्या सात सत्रांत १०० टक्के उपस्थितीची नोंद झालीय.

एस आर बालासुब्रमण्यम, वय ७५ वर्ष

75 वर्षांचे खासदार एस आर बालासुब्रमण्यम यांच्या या रेकॉर्डची बरोबरी करणं सत्ताधारी किंवा तरुण खासदारांनाही शक्य झालेलं नाही.

तर, अशोक वाजपेयी, डी पी वत्स, नीरज शेखर, विकास महात्मे आणि राजकुमार वर्मा या खासदारांनी गेल्या सहा सत्रांत १०० टक्के हजेरी नोंदविली आहे.

supreme court : सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी पुन्हा सांगितले लोकमान्य टिळकांचे ते शेवटचे शब्द…
lakhimpur kheri violence : ​लखीमपूर हिंसाचारात पत्रकाराचाही मृत्यू, मृतांची संख्या ९ वर
राज्यसभा सचिवालयाची माहिती

राज्यसभेच्या दररोजच्या कामकाजादरम्यान जवळपास ७८ टक्के खासदारांच्या उपस्थितीची नोंद होते. राज्यसभेच्या सचिवालयाच्या एका अहवालातून ही माहिती समोर आलीय.

यातूनच, एआयडीएमके खासदार एस आर बालासुब्रमण्यम राज्यसभेत नियमित चर्चेला हजेरी लावणारे एकमेव खासदार आहेत, असं समोर आलंय. ७५ वर्षीय बालासुब्रमण्यम यांनी राज्यसभेच्या गेल्या सात सत्रांतील १३८ पैंकी १३८ कामाचे दिवस आपली उपस्थिती नोंदविली आहे.

सोबतच, केवळ एखाद्य सत्राबद्दल विचार केला तर ३० टक्के खासदारांनी १०० टक्के हजेरी लावलीय. मात्र, शून्य हजेरी अर्थात एकही दिवस उच्च सदनात उपस्थिती न लावणाऱ्या खासदारांची संख्या कमी राहिलीय.

facebook whatsapp instagram suffer major global outage : जगभरात फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामचे सर्वर डाउन, सेवा ठप्प
Covid19: चार तासांचा प्रवास केवळ १५ मिनिटांत, पहिल्यांदाच करोना लसीची ड्रोननं वाहतूक!

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here